आमच्या संस्थेबद्दल
श्रद्धा सबुरी सहकारी पतसंस्थाची स्थापना दि. २६ जानेवारी २०१६ रोजी झाली. मागील ७ वर्षांपासून संस्थेचा प्रवास अविरत चालू आहे. संस्थेचा विस्तार आज रोजी ३ शाखा अनुक्रमे मानखुर्द दादर व वाशी येथे झाला आहे व नवीन शाखेचा मानस संस्थेचा आहे. पुर्णपणे डिजिटल बँकिंग सेवा कार्यरत करण्याचा संस्थेचा मानस आहे. डिजिटल आधारे बँकिंग व संस्थेचा सभासद व ग्राहकांना सरळ व सोप्या प्रकारे बँकांचे दैनंदिन व्यवहार करता यावे हे एकमेव उद्दिष्ट संस्थेचे आहे.
संस्थेचा प्रवास हा योग्य प्रकारे व्हावा याचे संस्थापक मंडळ काळजीपूवक लक्ष्य ठेवून आहेत ज्यामुळे आपले सभासद संख्या रोज वाढत आहे. संस्थेचे दैनंदिन व्यवहार पुर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी सर्व शाखेचे शाखाप्रमुख हे मुख शाखेशी संलग्न आहेत व मुख्य शाखा निर्देशावरून कार्य करून सेवा पुरवितात .आज रोजी संस्थेचे ३६०० सभासद संख्या असून ती लवकरच १०००० करण्याचा मानस संस्थेचा आहे. संस्थेचा लवकरच १० कोटी चा प्रवास पूर्ण करणायचा संस्थेचे उद्दिष्ट आहे. आमच्या सभासद व ग्राहक आणि उत्त्तम कर्मचारी वृंद यांचा विश्वासावर संस्था येणाऱ्या काळात नवीन नवीन उपक्रम राबवून आपले उद्दिष्ट पूर्ण करणार याचा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे. संस्थेतील ग्राहक समाधानी ठेवणे व त्यांना संस्थेमार्फत सर्व बँकिंग सेवा पुरवणे हेच ध्येय मानून आम्ही अखंडपणे कार्यरत आहोत आणि बदलत्या काळानुसार नवं नवीन तंत्रज्ञान वापरून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा, सुविधा ग्राहकांना पुरविण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत. आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना एक विश्वासू साथीदार म्हणुन नेहमीच मदतीचा हात देत आलो आहोत. आम्ही प्रेरणा,अखंडता आणि गुंतवणूक या तिहेरी मूल्यांनुसार कार्य करतो आणि त्यानुसार आमच्या
सेवांद्वारे आपल्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर राहतो. आज रोजी संस्थेची सुसच्च व भव्य कार्यालय मोठ्या थाटाने उभे आहे.आधुनिक तंत्राद्यान प्रणाली व उत्तम अनुभवी कर्मचारी वृंदा याच्या विश्वासावर संस्था येणाया काळात नवीन सभासद जोडून महाराष्ट मध्ये नावारूपास येत आहे