सस्नेह नमस्कार…
संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपणाशी सुसंवाद साधताना अत्यंत आनंद वाटतो कि, श्रद्धा सबुरी सहकारी पतसंस्थाची स्थापना दि. २६ जानेवारी २०१६ रोजी झाली. मागील ७ वर्षांपासून संस्थेचा प्रवास अविरत चालू आहे . या संस्थेच्या माध्यमातून बँकिंग व सहकारी क्षेत्रात अग्रक्रमाने आगेकूच करत असतांना आम्ही आमच्या सन्माननिय ग्राहकांना वेळोवेळी बँकिंगच्या मार्फत मदतीचा हात पुढे करून, होणा– गैरसोयी टाळण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा मानस सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
सर्व सामान्य व्यक्तींना बँकिंग व्यवहार सुलभतेने करता यावेत, या दृष्टिकोनातून सन २०१६ मध्ये आम्ही श्रद्धा सबुरी सहकारी पतसंस्थाची स्थापना केली. व ६ वर्षांपूर्वी आम्ही या संस्थेच्या रूपाने बँकिंग क्षेत्रात एक पाऊल ठेवले तसेच व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग व सर्वसामान्य ग्राहकांना सेवा देण्याचे काम आम्ही करत आहोत व त्यास आपल्या सर्वांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभत आहे त्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार… सर्व शाखेतील ग्राहकांना फोन द्वारे संपर्क करून त्यांच्या शाखेतील व्यवहार करण्या बाबत ज्या काही अडचणी असतील त्या बाबत चर्चा करण्यात येते. व या नंतर त्या विभागाचे विभागीय व्यवस्थापक, व्यवस्थापक हे त्या शाखेतील ग्राहकांची त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन व्यवहार करण्या बाबत त्यांच्या असलेल्या अडचणी बद्दल चर्चा करण्यात येते.
तसेच प्रत्येक शाखेच्या अंतर्गत कामकाजाची पाहणी करण्यासाठी कॉर्पोरेट ऑफिस ची ऑडिट टीम यांच्या मार्फत प्रत्येक महिन्याला शाखेस भेट देऊन शाखेची व शाखेतील प्रत्येक गोष्टीची बारकाईने अंतर्गत तपासणी करण्यात येते. अशाप्रकारे आर्थिक मदतीची प्रेमळ सावली आपल्या सारख्यांना मिळावी म्हणून आम्ही सदविवेक बुद्धीने संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आहे. बँकिंग क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षम जलद व वैविध्यपूर्ण सेवा पुरविण्याचा व संस्थेतील ग्राहक समाधानी राहण्याचा हेतू साध्य करण्या करीता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. १०० कोटींच्या व्यवहारी यशस्वी वाटचाल करत आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सहकार्य व विश्वासाच्या पाठबळावर, आम्ही सदैव प्रगतीपथावर राहून सर्वाना एक चांगल्या प्रकारची बँकिंग सेवा पुरविण्याचे काम करुत, याची आम्हाला खात्री आहे.
धन्यवाद…!